गुन्हेगारी

खातगाव टाकळी शिवार,ता.जि.नगर येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अकरा लाख आठ हजार तिनशे रुपये किमतीचा हिरा पान मसाला गुटखा कारवाईत जप्त

अहमदनगर दि. ,३ सप्टेंबर (प्रतिनिधी)
सविस्तर हाकिकत एम.आय.डी .सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की ‘हॉटेल महाराजा जवळ, कल्याण रोड, खातगाव टाकळी शिवार, ता. जि. यांनी कळविले की,एक पांढरे रंगाचे पिकअप नं. एम एच ०९ जी जे ०४४३ हि मधुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ हिरा पानमसाला गुटखा इचलकरंजी वरुन नगर मार्ग घारगाव घेऊन निघाला आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोना/ सचिन अडबल,पोना/विजय ठोंबरे, पोकॉ/रोहित मिसाळ, पोकों/शिवाजी ढाकणे,पोना/विशाल गवांदे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर तसेच पोकॉ प्रशांत राठोड नेम – सायबर पोलीस ठाणे अदी कर्मचाऱ्यांचे पथक
०२/०९/२०२३ हॉटेल महाराजा जवळ, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक कल्याण बायपास येथून खासगी कल्याण रोड, खातगाव टाकळी शिवार, ता जि. अ.नगर या ठिकाणी सापळा लावला असता ०७/०० वा. चे सुमारास बातमीतील नमुद वर्णनाची पांढरे रंगाची पिकअप येतांना दिसली. त्यावेळी आमची बातमीतील हकीगती प्रमाणे खात्री झाल्याने सदर पिकअप गाडीवरील चालकास गाडी थांबविणे बाबत इशारा करुन त्याचे ताब्यातील गाडी रोडचे कडेला घेण्यास सांगुन गाडीमधील चालक व त्याचे सोबत असलेल्यास दोन इसमांना ओळख समजावुन सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांचे नांव चालक १) अजित हनुमंत लमखाने, वय ३३ रा शिवणकवाडी, ता शिराळ, जि कोल्हापुर, २)राहुल अरुण जाधव, वय ३५. रा कसणाल, ता निपाणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक, ३) सोहेल जनुददीन तांबोळी, वय ३३ रा घारगाव संगमनेर असे असल्याचे सांगुन चालक अजित हनुमंत लमखाने याने सदरचा माल हा ४) शुभम चेंडके, रा शिवणकवाडी, ता शिराळ, जि. कोल्हापुर, (फरार) याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. सदर इसमांना त्यांचे ताब्यातील पिकअप गाडीचे झडतीचा उद्देश समजावून सांगुन सदर गाडीची झडती घेता त्यामध्ये खालील वर्णनाची व किमतीची हिरा पानमसाला मिळुन आला तो खालील प्रमाणे १) २,३७,६०० रुपये किमतीचे हिरा पान मसाला असे नांव असलेले गुटख्याचे १९८० पुढे २० गोण्यामध्ये असलेले व प्रत्येक पुड्यावर छापील किंमत १२० रुपये असलेली,२) ५९,४०० रुपये किमतीची रॉयल ७१७ असे नांव असलेल्या सुगंधी तंबाखुच्या १० गोण्या त्यामध्ये १९८० पुडे असलेले व प्रत्येक पुड्यावर छापील किंमत ३० रुपये असलेली. ३) ११,३०० रु रोख रक्कम इसम सोहेल जनुददीन तांबोळी, याचे पॅन्टचे डावे खिशात मिळुन आली ती ४) ८,००,००० रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पांढरे रंगाची मॅक्स पिकअप गाडी क्रमांक एम एच ०९ जी जे ०४४३ असा असलेली ११,०८,३०० रुपये एकुण येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किमतीचा हिरा पान मसाला गुटखा मिळुन आल्याने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ हिरा पानमसाला गुटखा खाण्यासाठी अपायकारक आहे माहित असतांनाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर होऊन सदर इसमांविरुध्द भा. द. वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दीली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोना/ सचिन अडबल,पोना/विजय ठोंबरे, पोकॉ/रोहित मिसाळ, पोकों/शिवाजी ढाकणे,पोना/विशाल गवांदे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर तसेच पोकॉ प्रशांत राठोड नेम – सायबर पोलीस ठाणे यांनी कारवाई केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे