सामाजिक
विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाईंचा आदर्श समोर ठेवून जीवनात यशस्वी व्हावे – प्रा. जोगेंद्र कवाडे

अहमदनगर दि. १९ ऑगस्ट (प्रतिनिधी)
पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळा अ. नगर येथे मे .पारस नांगर फर्म यांच्या सहकार्यातून संचालक संतोषशेठ बोथरा आणि बोथरा उद्योग समुहाच्या वतीने
शालेय उठाव कार्यक्रमांतर्गत इ १ ली ते ४थी च्या १४० विद्यार्थ्यांना गणवेश वितरण प्रसंगी माजी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे सर बोलत होते .
विद्यार्थी आणि त्यांना घडविणारे शिक्षक हा समाजाचा कणा आहे . हा कणा उभा करण्यासाठी दिवंगत अध्यक्ष दा. भि. गायकवाड गुरुजी यांच्या प्रेरणेतून गेली ३० वर्षापासून हा शैक्षणिक उठाव कार्यक्रम शाळेत राबवत असल्याबददल मा संतोष शेठ बोथरा आणि बोथरा उद्योग समूहाचे आ जोगेंद्र कवाडे सर यांनी आभार मानले .
प्रास्ताविक करताना सेक्रेटरी प्रा जयंत गायकवाड यांनी शाळा व बोथरा परिवाराबददल गौरवोदगार काढले याप्रसंगी पो निरीक्षक मधूकर साळवे , मा मनिषा बोगावत मॅडम ,अशोकराव गायकवाड ,सुरेश बनसोडे, अनिल शेकटकर, देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर,अध्यक्ष सुमेध गायकवाड ,सेक्रेटरी प्रा जयंत गायकवाड ,प्रा भिमराव पगारे , युवानेते सोमा शिंदे,सारंग पाटेकर,पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, राधा पाटोळे, मीरा गवळी, नेवासा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मधुकर पावसे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभिव, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे,सामजिक कार्यकर्ते विजय वडागळे,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे,सतीश चाबुकस्वार सर,राजुभाऊ शिरसाठ,जितेंद्र शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपक्रम प्रमुख शेखर उंडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगला गोसावी, ज्योती वांगणे, वंदना शिरसाठ ,लुमाजी साबळे ,सोनाली तिवारी यांनी परिश्रम घेतले.
सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक रमेश उकर्डे यांनी मानले.