शिंदें साहेबांनी बंड केले त्यावेळी “खोक्याची भाषा” अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडून सरकार मध्ये सामील झाले. तेव्हा खोक्याची ओरड करणाऱ्या लोकांची तोंड का बंद झाली? प्रा.जोगेंद्र कवाडे

अहमदनगर दि. १८ ऑगस्ट (प्रतिनिधी) शिंदे साहेबांनी शिंदें साहेबांनी बंड केले त्यावेळी “खोक्याची भाषा” अजित पवार राष्ट्रवदीतून बाहेर पडून सरकार मध्ये सामील झाले. तेव्हा खोक्याची ओरड करणाऱ्या लोकांची तोंड का बंद झाली? असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.जयंत गायकवाड,ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर, जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,पत्रकार महेश भोसले, सोमा शिंदे,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,महेमुदा पठान, कर्जतचे महेंद्र साळवे,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष मोकळ नेवासा तालुक्याचे मधुकर पावसे संजय ऊनवणे, रऊफ कुरेशी,अतुल सोनवणे, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष विलास गजभिव यांनी पाथर्डी तालुक्यातील गायरान जमिनी बाबत प्रा.कवाडे यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले.यावेळी ,अल्पसंख्याक आघाडीचे हाजी रशीदभाई जहागीरदार,पक्षाचे जिल्हा सुमेध गायकवाड यांच्या नूतन घराच्या वास्तू प्रवेश कार्यक्रमासाठी ते नगरला आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले,पूर्वीचे महाविकास युतीचे सरकार गले. सत्ता गेल्यामुळे ते निराशेपोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टिका करत आहेत.आम्ही शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस मिळून सरकार बनविले,त्यात आम्ही त्यात मित्र पक्ष म्हणून होतो. सरकार स्थापन केले. याबाबत राज्य स्तरावर एक समन्वय समिती असावी असा आमचा त्यावेळच्या सरकारला आग्रह होता.सतेत वाटा मिळाला नाही. याबद्दल वाईट वाटत नाही.पण राज्यातील विकासाच्या निर्णयाबाबत सुद्धा विचारले जात नव्हते. आमच्या वाट्याला उपेक्षाच वाट्याला आल्याने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला.पूर्वी महा विकास आघाडीचे सरकार होते परंतु ते लोकाभिमुख नव्हते.राज्याचा कारभार मातोश्रीवरून चालत होता. म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू होते.त्यामुळे राज्याच्या विकासाची कामे मागे पडली असल्याचा आरोप देखील त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.शिंदेंच्या माध्यमातून एक गतिमान सरकार आले आहे.सर्व सामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल . हे प्रयत्न एकनाथ शिंदे सरकारचे आहेत.राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे सरकारची घोडदौड सुरू आहे. हे अभिमानास्पद आहे.पण सरकार कितीही बदलले तरी दलित आदिवासी वरील अन्याय दूर होत नाही. नगर जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा अत्याचार पीडित जिल्हा म्हणून घोषित करावा अशी आमच्या पक्षाची पूर्वीचीच मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,या महिन्यात 22,23 तारखेला आमच्या पक्षाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबर चर्चा होणार असून विधानसभेच्या ५१ व लोकसभेच्या ११ जागा लढविण्याचा पक्षाचा मानस आहे. होणाऱ्या चर्चेत जास्त ओढतान होणार नाही अशी आमची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.