नांदेड हत्याकांडाचा निषेध,रिपाइंचे प्रशासनाला निवेदन

राहुरी(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे अक्षय भालेराव या दलित युवकाच्या झालेल्या हत्येचा निषेध म्हणून रिपाइं(आठवले गट)च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
गावात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याने जातीयवादी लोकांच्या मनात पोटशूळ उठला व त्यातूनच अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली शासनास निवेदन देण्यात आले,त्यात पुढील मागण्या करण्यात आल्या-अक्षय भालेराव च्या कुटुंबास ५० लाख रुपयांची तातडीने मदत द्यावी, मयताच्या भावास जो हल्ल्यात जखमी झाला आहे त्यास शासकीय नोकरी द्यावी,बोंडार हवेली या गावात कायम स्वरूपी पोलिस चौकी स्थापन करावी,भालेराव कुटुंबास पोलिस संरक्षण द्यावे,आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,हा खून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा,तपासी अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास करावा,तपासात हयगय केल्यास तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
राहुरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविणभाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनावर तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविणभाऊ लोखंडे,जिल्हा सरचिटणीस व प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत सगळगीळे,जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे,तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ चांदणे,महिला आघाडी अध्यक्ष स्नेहलताई सांगळे,शहर प्रमुख बबन साळवे आदींच्या सह्या आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे,तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे,जिल्हा सरचिटणीस व प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत सगळगीळे, संघटक अनुसंगम शिंदे,महिला तालुका आघाडी अध्यक्ष स्नेहलताई सांगळे,राज्य संघटक गोविंद दिवे,तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ चांदणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी किरण साळवे,अरूणराव साळवे,उत्तमराव साळवे,दिपक साळवे,महिला आघाडी उपाध्यक्षा प्रियंका सगळगीळे, संघटक वंदना सगळगीळे,वामन नवतुरे,राजू साळवे,मुख्तार कुरेशी,प्रकाश लाहुंडे,ज्ञानेश्वर आल्हाट,राजू बागुल,बाबासाहेब लिहिणार,बाळासाहेब पडागळे,सिद्धार्थ साळुंके,सचिन डहाणे,अंजुमभाई पटेल,पिंटूभाऊ आल्हाट,सचिन साळवे,संजय साळवे,पप्पू साळवे,प्रमोद तोरणे,सचिन भीमराज साळवे,तेजस साळवे,विकी साळवे,नवनाथ गायकवाड,तेजस वाघ,