सामाजिक

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी अक्षय भालेराव हत्या पीडित कुटुंबीयांचे केले सांत्वन!

नांदेड दि.५ जून (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर आज
दिनांक 5 जून 2023 सोमवार रोजी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर यांनी नांदेड येथे जाऊन सायंकाळी 6 वाजता अक्षय भालेराव यांच्या बोंढार या गावाला भेट दिली आणि जातीयवादी गावगुंडांच्या
सशस्त्र मारहाणीमध्ये गंभीर जखमी असलेल्या अक्षय भालेराव च्या आई व भावांची आणि काकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले या भेटीदरम्यान आदरणीय प्रा *जोगेंद्र कवाडे* सरांनी *अक्षय भालेराव* च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून *श्रद्धांजली* वाहिली
या भेटीदरम्यान पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी *गोपाळराव* *आटोटे*, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष *चरणदास इंगोले* प्रदेश महासचिव तथा नांदेड मनपा माजी नगरसेवक *बापूराव गजभारे* जिल्हाध्यक्ष *विनोद भरणे* , रवींद्र बानमारे परभणी जिल्हा नेते संजय शिंदे कुशिनारा सोमकुवर मोहन गर्दनमारे सतीश पांडवे साहेबराव सोनकांबळे संघरत्न खंडारे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासोबत होते.
आपल्या या भेटीदरम्यान दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आलेल्या *विशाल धरणे आंदोलन* स्थळी भेट देऊन उपस्थित आंदोलनकर्त्यांसमोर आदरणीय प्रा.जोगेंद्र कवाडे सरांनी आपल्या भाषणातून अक्षय भालेराव याच्या झालेल्या क्रूर हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता नांदेड येथे अतिथी हॉटेलमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेलाही प्रा.कवाडे सरांनी संबोधित करून या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून या हत्याकांडाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची प्रमुख मागणी करून अक्षय भालेराव च्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घेण्याची व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ कमीत कमी 25 लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत करण्यात यावी तसेच सर्व आरोपींना अटक करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष माजीखासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर यांनी पत्रकार परिषदे मध्ये प्रेस मीडियाशी बोलताना दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर आज
दिनांक 5 जून 2023 सोमवार रोजी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार *प्रा जोगेंद्र कवाडे सर* यांनी नांदेड येथे जाऊन सायंकाळी 6 वाजता अक्षय भालेराव यांच्या बोंढार या गावाला भेट दिली आणि जातीयवादी गावगुंडांच्या
सशस्त्र मारहाणीमध्ये गंभीर जखमी असलेल्या अक्षय भालेराव च्या आई व भावांची आणि काकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले या भेटीदरम्यान आदरणीय प्रा *जोगेंद्र कवाडे* सरांनी *अक्षय भालेराव* च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून *श्रद्धांजली* वाहिली
या भेटीदरम्यान पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी *गोपाळराव* *आटोटे*, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष *चरणदास इंगोले* प्रदेश महासचिव तथा नांदेड मनपा माजी नगरसेवक *बापूराव गजभारे* जिल्हाध्यक्ष *विनोद भरणे* , रवींद्र बानमारे परभणी जिल्हा नेते संजय शिंदे कुशिनारा सोमकुवर मोहन गर्दनमारे सतीश पांडवे साहेबराव सोनकांबळे संघरत्न खंडारे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासोबत होते.
आपल्या या भेटीदरम्यान दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आलेल्या *विशाल धरणे आंदोलन* स्थळी भेट देऊन उपस्थित आंदोलनकर्त्यांसमोर आदरणीय *प्रा.जोगेंद्र कवाडे* सरांनी आपल्या भाषणातून अक्षय भालेराव याच्या झालेल्या क्रूर हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता नांदेड येथे अतिथी हॉटेलमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेलाही प्रा.कवाडे सरांनी संबोधित करून या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून या हत्याकांडाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची प्रमुख मागणी करून अक्षय भालेराव च्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घेण्याची व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ कमीत कमी 25 लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत करण्यात यावी तसेच सर्व आरोपींना अटक करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष माजीखासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर यांनी पत्रकार परिषदे मध्ये प्रेस मीडियाशी बोलताना दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे