नांदेड येथील भीमसैनिक अक्षय भालेराव व गावातील दलित वस्तीवर हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी- अजय साळवे खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी घडलेल्या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध!

अहमदनगर (प्रतिनिधी)- नांदेड येथील बोनडार गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अहमदनगर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अजय साळवे यानी केली आहे. भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या हत्येचा आणि बोनडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची जयती साजरी केली म्हणून राज्यात बर्याच ठीकाणी जातीय दगली झाले तरी शासन बघ्याची भूमिका घेत आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते. ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करत दिवंगत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांपैकी 7 जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करुन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने पचविस लाखाची आर्थिक मदत तात्काळ द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पूनर्वसन करावे. अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये व कायद्याचा धाक निर्माण झाला पाहीजे तसेच येथून पुढे रिपब्लिकन पार्टी जशास तसे उत्तर देनार असल्याचे म्हणाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अजय साळवे, जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव भांबळ, शहराध्यक्ष किरण दाभाडे, युवक अध्यक्ष अमित काळे, मंगेश मोकळ, सदाशिव भिंगारदिवे, गौरव भाकरे, चंद्रकांत भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, सुनील भाकरे, प्रमोद गायकवाड, भाऊ बोरुडे, अविनाश शिंदे, विनायक संभागळे, जयाताई गायकवाड, अनुसया भाकरे, प्रा. विलास साठे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.