अहमदनगर शहरात मोटार सायकल चोरी करणारी टोळी कोतवाली पोलीसांनी केली जेरबंद कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हददीतील चोरी केलेल्या २,१५,०००/- रु किंमतीच्या ७ मोटरसायकली जप्त!

अहमदनगर दि.३ जून (प्रतिनिधी)
अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष पथक स्थापन करून अहमदनगर शहरातील मोटार सायकल चोरी करणारे इसमांचा शोध घेणेबाबत आदेश दिल्याने विशेष पथकातील पो ना / १४२९ शाहोद सलीम शेख, यो ना/ १३८ रसलीम रमजान शेख, पोकों/ ९५७२ प्रमोद मधुकर लहारे पोको/ १७९६ सुमित सदाशिव गवळी, पोको १९९९ दिपक भागुजी रोहोकले अशांनी गुप्त बातमी काढून आयुर्वेदीक कॉर्नर अहमदनगर येथे मोटार सायकली चोरणारा इसम नामे गणेश देविदास नमना हा चोरीच्या मोटार सायकलसह येणार असल्याची माहिती मिळाल्याने आयुर्वेदीक कॉर्नर अहमदनगर येथे सापळा लावून गणेश देविदास नलना रा. पाईप लाईन रोड अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर मोटार सायकल बावत चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विश्वासात घेऊन मोटार सायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही तोफखाना पोलीस स्टेशन हददीतून चोरून आणल्याची कबुली दिल्याने त्याने अहमदनगर शहरात व परिसरात आणखी मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली देऊन सदर चोरी केलेल्या मोटार सायकल त्याचे साथीदार १) आनंद अनिल काळे वय २५ वर्षे रा. गणेशनगर, वार्ड नं.२ ता. राहता जि.अहमदनगर २) सचिन रावसाहेत चव्हाण वय २३ वर्षे रा. पानेगाव ता. घनसांगवी जि. जालना यांच्या मार्फतीने विक्री करीत असल्याची कबुली दिल्याने त्यास सोबत घेऊन अस्तगाव ता राहाता जि अहमदनगर येथे जाऊन सापळा रचून आरोपीचे वर नमुद दोन्ही साथीदारांना ताब्यात घेऊन आरोपी नामे १) गणेश देविदास नल्ला वय २४ वर्ष रा. श्रमीकनगर, पाईपलाईनरोड, अहदमनगर २) आनंद अनिल काळे वय २५ वर्षे रा. गणेशनगर, वार्ड नं. २ ता. राहता जि. अहमदनगर ३) सचिन रावसाहेत चव्हाण वय २३ वर्षे रा. पानेगाव ता. घनसांगवी जि. जालना यांना कोतवाली पोलीस स्टेशन गुर नं २७०/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त केलेल्या एकुण ०७ मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे
१) ३०,०००/- रु कि.ची काले रंगाची त्यावर लाल पटटे असलेली एच एफ डिलक्स मोटार सायकल पुढील व पाठीमागील बाजुस नंबर नाही तीचा चेसी नं.MBLHA७१५२४९००५६६ त्यांचा इंजोन
नं. HA९९EMH- ९४००५२४ असा असलेली असा असलेली जुवाका २) ३५,०००/- रु किंची निळया रंगाची पेंशन प्रो मो.सा तीस पुढील व पाठीमागीली बाजुस नंबर प्लेट नाही.
तीचा चेसी नं. MBLHA१०EL९९०७१२३ असा असलेल जुवाकि ३) ३०,०००/- रु. कि.ची काळे रंगाची त्यावर लाल पटटे असलेली एच एफ डिलक्स मोटार सायकल पुढील व
पाठीमागील बाजूस नंबर नाही तीचा चेसी नं. MBLHAW०७६४०१५६२ व इंजीन नं.
HA१९EPK-४C०८९९२ असा असलेली जुवाकिज, ४) ३०,०००/- रु किची काळे रंगाची त्यावर राखाडी रंगाची पटटे असलेली स्पेंटर मोटार सायकल पुढील व
पाठीमागील बाजुस नंबर नाही तोचा चेसी नं. ०२D२००६१९५ व इंजीन नं. ०२११८.०२२७२
असा असलेली जुवाकिअ,
५) ३०,०००/- रु. कि.ची काळे रंगाची त्यावर राखाडी रंगाची पटटे असलेली स्पेटर मोटार सायकल पुढील व
पाठीमागील बाजूस नंबर नाही तोचा चेसी नंMBLHA १०EZCH५०४५० व इंजोन नं.
HA१०EFCHC३७४५३ असा असलेली जुवाकिअ
६) ४०,०००/- रु कि.ची राखाडी रंगाची अॅक्टीवा मोपेड गाडी पुढील व पाठीमागील बाजुस नंबर नाही तीचा इंजीन नं. JC४४-०९२३१८८ असा असलेली जुवाकिअ
७) २०,०००/- रु. कि.ची एक काळया रंगाची एचएफ डिलक्स तिचा चेसीस नंबर MBLHAYUGGG०५६७९ व इंजिन नंबर HAREJGGG०२५२३ असा असलेली जुवा किं.अं.
सदरची कारवाई ही श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर व श्री अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधीकारी नगर शहर उपविभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोसई मनोज कचरे, पो ना (१४२९ शाहीद शेख, पोकी/१५७२ प्रमोद मधुकर लहारे, पोकी/१७९६ सुमित गवळी, पो कॉ १९२९ दिपक रोहोकले पोना/ योगेश कवाष्टे, पो ना रवि टकले, पोना महेश बोरुडे, पो ना / ३९२ मुकुंद दुधाळ, पोका तानाजी पवार तसेच सदर गुन्हयाचा तपास पो ना १३८१ सलिम शेख हे करत आहेत.