भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन महामानवाचे विचार व कार्याने बदल घडून समाजाला दिशा मिळणार : भाऊ भिंगारदिवे

अहमदनगर दि.१८ एप्रिल ( प्रतिनिधी) : वंचितांच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करुन समाज परिवर्तनाचे महानायक ठरले. सामाजिक समतेसाठी विषमतेविरोधात तर न्यायासाठी अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला त्यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आजही समाज जाती व विषमतेच्या बंधनात अडकला जात असताना या महामानवाचे विचार व कार्याने बदल घडून समाजाला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रतिपादन भाऊ भिंगारदिवे यांनी केले
भिंगार येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १७ रोजी महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी भिंगारदिवे, विजय भांबळ, जेवियर भिंगारदिवे, सादिक सय्यद, भाऊ भिंगारदिवे, नामदेव लंगोटे, प्रदीप कुमार जाधव, सुरेश बनसोडे, मारुती पवार, अमित खामकर, पप्पू पाटील, महेश भोसले, सिद्धार्थ आढाव, आदी उपस्थित होते
नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाला. असे ते म्हणाले