श्री आनंद महाविद्यालयात संविधान दिन साजरा!

पाथर्डी दि.२७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत संविधान दिना निमित्त संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते. कार्यक्रमाची सुरुवात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधान हा लोकशाहीचा आत्मा असुन घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही सदृढ करण्यासाठी मोठे योगदान दिले असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी संविधान दिना निमित्त संविधान उद्देशिका चे सामूहिक वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रा. डॉ. मुक्तार शेख, प्रा. अनिता पावसे, प्रा. डॉ. जयश्री खेडकर, प्रा. डॉ. विकास गाडे, प्रा. डॉ. अनिल गंभीरे, बथूवेल पगारे, प्रा. सूर्यकांत काळोखे, डॉ. अजिंक्य भोर्डे, डॉ. धीरज भावसार, डॉ. प्रतीक नागवडे, प्रा. अरूण बोरुडे , प्रा. रुपाली शिंदे तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.