प्रशासकिय

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामाचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे घेणार आढावा

अहमदनगर दि. 29 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) :- 1 जानेवारी , 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक घेणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाचे सुधारित कार्यक्रमानुसार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 27 ऑक्टोबर 2023 ते 09 डिसेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालवधीत 4 व 5 नोव्हेंबर तसेच 25 व 26 नोव्हेंबर, 2023 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहीम कालावधीत मतदार नाव नोंदणी करण्याबाबतचे 13 हजार 210 अर्ज, नाव वगळणी 2 हजार 577 अर्ज व मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करण्याबाबतचे 2 हजार 744 असे एकूण 18 हजार 531 अर्ज प्राप्त झाले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे