सामाजिक
ॲड.संदीप पाखरे यांची अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी निवडणुकीत संचालकपदी बिनविरोध निवड! नीलक्रांती चौक परिसरात नागरिकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून केला आनंदोत्सव!

अहमदनगर दि. २१ मार्च (प्रतिनिधी) नगर शहरात गोरगरिबांचा वकील म्हणून ओळखले जाणारे ॲड.संदीप पाखरे यांची अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी निवडणुकीत संचालकपदी बिनविरोध निवड!
नीलक्रांती चौक परिसरात नागरिकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील वकीलांच्या महत्वपुर्ण असलेल्या अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी २०२३ पंचवार्षिक निवडणुकीत १२ जागेसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ॲड.संदीप पाखरे बिनविरोध निवडुन आले आहेत.ॲड.संदीप पाखरे यांचा सामाजिक कार्यामध्ये कायम सहभाग असून त्यांच्या निवडी बद्दल सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.