महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधीत तंबाखू कब्जात बाळगणा-या आरोपीच्या भिंगार कॅम्प पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

अहमदनगर २३मार्च (प्रतिनिधी)
दि. 22/03/2023 रोजी दुपारी 12/30 वा. सुमा जानकी कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर ता.जि. अहमदनगर येथे एक इसम हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधीत तंबाखू शरीरास अपायकारक आहे हे माहीत असतानाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात ठेवलेली आहे अशी गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती कॅम्प पो स्टे चे सपोनि. श्री. दिनकर मुंडे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडील पथक छापा टाकणे कामी व कारवाई करणे कामी रवाना केल्याने जानकी कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर ता. जि. अहमदनगर येते एक इसम हा त्याचे कब्जात त्याचे घराचे शेजारील पत्र्याचे शेडमध्ये 1) 47,500/-रू किं चे बारीक सुपारी प्रत्येकी 25 किलो ग्रॅम वजनाचे 5 पिस्ता रंगाच्या गोन्या त्यावर 555 DIAMOND GOLD असे लिहलेले प्रत्येकी 9,500/- रू प्रमाणे 2) 8,000/- रू किं.च्या प्रत्येकी अंदाजे 10 किलो ग्रॅम वजनाच्या 4 पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये सुगंधी तंबाखू प्रत्येकी 2,000/- रू प्रमाणे 3) 11,700/- रू किं च्या 09 प्लॅस्टीक पुडे प्रत्येकी अंदाजे 5 किलो ग्रॅम वजनाच्या गोल्डन रंगाचे पाकीट त्यावर 5 Kg (net weight) असे लिहलेले सुगंधी तंबाखू अंदाजे 1300/- रू प्रमाणे4) 2,800/- रू किं चे सुट्टे काळे रंगाचे प्लॅस्टीकचे 14 पाकीटे अंदाजे अर्धा किलो वजनाचे प्रत्येकी 200/-रू प्रमाणे 5) 12,000/- रू किं चा एक काळे रंगाचा realme कंपनीचा अँन्ड्रॉईड मोबाईल जु.वा. कि. अं. असा एकून 82,000/- रू. चा मुद्देमाल आरोपी नामे रशीद बशीरभाई फकीर उर्फ फक-या वय 47 वर्षे रा. जानकी कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर ता.जि. अहमदनगर यांचे कब्जात मिळून आला असून आरोपी व मुद्देमाल भिंगार कॅम्प पो स्टे ला आणून आरोपी विरूद्ध भिंगार कॅम्प पो स्टे गु र नं 166/2023 भादवि कलम 188,272,273 प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ/208 विलास रभाजी गारूडकर हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो. स्टे. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोहेकाँ/760 अजय नारायण नगरे, पोहेकाँ/बीभिषन दिवटे, पोना/2178 राहुल राजेंद्र द्वारके, पोना/2284 संदिप नारायण साठे, पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड, मपोकाँ/1701 रूपाली दगडू शेलार यांनी केली आहे.