वारली पेंटींगची भेट देऊन डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव..

अहमदनगर दि. ९ मार्च (प्रतिनिधी) – इन्स्टिटयूट ऑफ एन्टरप्रिन्यूरशिप अँड मॅनॅजमेन्ट स्टडीज ऑटोनॉम्स व्हर्चुअल मोड युनिव्हर्सिटी यांच्याकडून स्नेहबंध सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मान करण्यात आला. यानिमित्त डॉ. शिंदे यांचा भिंगार येथील कॅन्टोन्मेंट शाळेतील कलाशिक्षक अरविंद कुडिया यांनी वारली पेटींगची भेट देऊन गौरव केला.*
*याप्रसंगी मारुतीराव मिसळवाले चे संचालक अमित खामकर, सुशिला शिंदे, अर्चना शिंदे, पियूष शिंदे उपस्थित होते. उद्धव शिंदे यांनी स्नेहबंध फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक तसेच अनाथ, दिव्यांग, निराधार, गरीब विद्यार्थी यांच्यासाठी काम केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनेत्री आदिती गोवित्रीकर यांच्या हस्ते डॉक्टरेट देण्यात आली. यानिमित्त कुडिया यांनी डॉ. शिंदे यांचा सत्कार केला.
*जीवन कष्टमय असले, तरी त्यातून जगण्याचा आनंद घेता येतो, असा संदेश या वारली पेंटींगमधून देण्यात आला आहे.*
*ही अनपेक्षित भेट मिळाल्यानंतर स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, वारली ही कला महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचा, अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. हे चित्र मी माझ्या घरात नक्की लावेन.