भगत कुटुंबियांची माजी महसूल मंत्री आ. थोरातांनी घेतली सांत्वन पर भेट

अहमदनगर दि. ९ मार्च (प्रतिनिधी) : अशोकराव उर्फ शिवाजीराव भगत यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पारनेरचे दिवंगत माजी आ. बाळासाहेब भगत यांचे ते चिरंजीव व महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत यांचे पती होते. शहर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी भगत कुटुंबीयांची या दुःखद घटनेबद्दल त्यांच्या सावेडी येथील निवासस्थानी भेट घेत सांत्वन केले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, आ. लहू कानडे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, ह.भ.प. पोकळे महाराज तसेच भगत कुटुंबीय उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले की, स्व. बाळासाहेब भगत, स्व. शिवाजीराव भगत यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर सक्रिय राहत समाजाची सेवा करण्याचे काम केलं. स्व. शिवाजीराव यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा चांगल्या रीतीने चालवला. त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे मनाला वेदना देणार आहे.