डॉ .मांडे यांच्या निधनाने संशोधनात्मक साहीत्याची मोठी हानी -ना.विखे पाटील

लोणी दि.23 डिसेंबर (प्रतिनिधी)
पद्मश्री डॉ प्रभाकर मांडे यांच्या निधनान साहीत्य क्षेत्रातील संशोधनात्मक साहीत्याची परंपरा पुढे घावून जाणारे व्यक्तिमत्व साहीत्य क्षेत्राने गमावले असल्याची भावना महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रा.डॉ मांडे यांनी आपले संपूर्ण आयुष्यच साहीत्य सेवेला समर्पित केले होते.त्यांनी आपल्या साहीत्य कृती निर्माण करताना संशोधनाला खूप महत्व दिले.लोककला आणि परंपराबाबत त्यांनी आग्रही मत आपल्या साहीत्यकृतीतून मांडली साहीत्य क्षेत्रातील त्यांचा सहा दशकांचा प्रवास हा साहीत्यातील संशोधन व समीक्षेसाठी समर्पित होता.त्यांच्या प्रत्येक साहीत्यकृतीतून सामाजिक संवेदनाच व्यक्त झाल्या असे विखे पाटील म्हणाले.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या सत्काराच्या निमिताने भेट झाली.परंतू कुठेही उमेद कमी होवू न देता तेवढ्याच दीलखुलासपणे त्यांनी साधलेल्या संवादात कुठेही बडेजाव पणा नव्हता.स्व.पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असलैल्या घनिष्ठ संबंधाच्या आठवणीना या भेटीप्रसंगी त्यांनी दिलेला उजाळा खूपच ह्रदयस्पर्शी होता याची आठवण ना.विखे पाटील यांनी आपल्या शोक संदेशात आवर्जून नमूद केली.
डॉ मांडे यांना साहीत्य क्षेत्रातील सेवेबद्दल अनेक सन्मान मिळाले.छत्रपती संभाजीनगर येथून नगर मध्ये वास्तव्यास आले. जिल्ह्याच्या साहीत्य क्षेत्राच्या दृष्टिने ही खूप मोठी उपलब्धी होती.