पत्रकारांबरोबर सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याकामी सदैव तत्पर : महेश भोसले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संदीप शिंदे यांची युवा ग्रामीन पत्रकार संघाच्या नगर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

अहमदनगर दि. 23 डिसेंबर (प्रतिनिधी) :- नगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संदीप शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नगर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनानुसार, विभागीय अध्यक्ष शरद तांबे यांच्या सूचनेप्रमाने युवा ग्रामीण पत्रकार संघाचे मोठे संघटन जिल्ह्यात तयार होत असून पत्रकारांबरोबर सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याकामी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश भोसले यांनी केले. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नगर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झालेले नूतन कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या निवडीबद्दल
जिल्हाध्यक्ष महेश भोसले जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे जिल्हा प्रमुख सल्लागार प्रभंजन कनिगध्वज नगर शहर अध्यक्ष अशोक तांबे शहर उपअध्यक्ष रोहित गांधी अर्जुन पाडळे यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.