राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळेंकडून काळे कुटुंबीयांचे सांत्वन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या निवासस्थानी भेट देत केले सांत्वन

अहमदनगर दि. 9 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : दिवंगत ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे यांचे नुकतेच निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या निवासस्थानी भेट देत काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुळे या आज नगर शहर व जिल्हा दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी काळे यांच्या घरी भेट देत केली.
यावेळी स्व. काळे यांच्या पत्नी मंगल काळे, मुलगा ॲड. नितीन काळे, सूना मनीषा काळे, स्नेहल काळे, कोमल काळे, अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रा. पोपटराव काळे, पाटबंधारे पतसंस्थेचे माजी चेअरमन व मराठा पतसंस्थेचे विद्यमान संचालक बाळकृष्ण काळे, दिलीपराव काळे, राजाबाबू पाठक, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.आदित्य काळे, इंजि. अक्षय काळे, अंबिका महिला बँकेच्या करुणा काळे, विजया काळे, स्वप्नील पाठक आदींसह काळे कुटुंबीय उपस्थित होते.
किरण काळे हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी सुमारे दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. स्व. गुलाबराव काळे हे सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा राष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काम करत होते. पवार कुटुंबीय व सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून किरण काळे यांची सुरुवातीपासून जिल्ह्यात ओळख आहे. यावेळी सुळे यांनी स्व. काळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली.