बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले राज्य बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी केली नियुक्तीची घोषणा

अहमदनगर दि. ८ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. बहुजन मुक्ती पार्टीचे औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रतापसिंह यांच्या हस्ते भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवाजी भोसले मागील अनेक वर्षापासून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून शोषित, पीडित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थ्यांचे प्रश्न व त्यांच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करीत आहे. सदैव मोर्चे, आंदोलनाच्या शासनाकडे या प्रश्नावर दाद मागत आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या पक्ष वाढीसाठी त्यांनी अविरतपणे काम करुन, मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीशी जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. तर केंद्र सरकारची हुकुमशाही, कामगार विरोधी धोरण, जाती-धर्माचे राजकारण याबाबत समाजात जागृतीचे कार्य ते विविध उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने करत आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, पार्टीचे राष्ट्रीय समीक्षा प्रभारी गौतम बनसोडे, युवाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार माने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ, वरिष्ठ पदाधिकारी लखनदादा चव्हाण, प्रताप पाटील, अॅड. सुजाता चौदंते, सारिका भगत, सौरभ गायकवाड, अल्ताउल्हा खान, अॅड. अनिल किनाके, महाराष्ट्र दक्षिण प्रभारी अमोल लोंढे, प्रदेश प्रवक्ते सुनिल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकार्यांनी भोसले यांचे अभिनंदन केले.