राहुरी येथील अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करुन सात लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई!

अहमदनगर दि. ८ फेब्रूवारी (प्रतिनिधी)
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनक मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, बापुसाहेब फोलाणे, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रणजीत जाधव, विनोद मासाळकर व उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने राहुरी पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 7,50,000/- रुपये किंमतीचे एक निळे रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची यादी व केनी तसेच एक विटकरी रंगाचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे 03 आरोपीं विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे भादविक व पर्यावरण कायदा कलमान्वये एकुण-2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1. राहुरी 126/2023 भादविक 379, 34 सह पकाक. 3/15 1. शशिकांत उध्दव बर्डे, वय 34, रा. बारागांव नांदुर, ता. राहुरी 4,50,000/- एक निळे रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची यादी व केनी
2. राहुरी 144/2023 भादविक 379 सह पकाक. 3/15 2. महेश वराळे रा. मल्हारवाडी रोड, ता. राहुरी 3,00,000/- विटकरी रंगाचा टेम्पो
एकुण 02 आरोपी 7,50,000/- एक निळे रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची यादी व केनी व विटकरी रंगाचा टेम्पो
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक साहेब, श्रीरामपूर, मा. श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.