राजकिय

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक निष्ठा व सर्व सामान्यासाठी संघर्ष याला आमचे सर्वोच्च प्राधान्य- नासीर शहानवाज शेख

पाथर्डी (प्रतिनिधी)

पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची पाथर्डी येथे नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय शुभांगी ताई पाटील यांना पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला व तसा ठराव एक मताने पारित करण्यात आला .याप्रसंगी बोलताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नासिर शहानवाज शेख म्हणाले की पाथर्डी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी हे पक्षाशी एकनिष्ठ असून कोणतीही तडजोड केली जाणार नाही कोणताही दबाव अथवा आमिषालाकोणीही बळी पडणार नाही, पाथडी तालुकाकाँग्रेस कमिटी तालुक्यांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत असून प्रचंड मेहनत घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष उभारणीचे कार्य जोमात केले असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने सहकार्याने तणमनधनाने आपले अमूल्य योगदान दिले आहे या सर्वांचा मला प्रचंड अभिमान वाटतो.
प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ फोटो यांनी काल नाशिक येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या आदेशाप्रमाणे महाविकास आघाडी उमेदवार माननीय सौ शुभांगी ताई पाटील यांना मताधिक्य देण्याचा आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे सेवा दल तालुका अध्यक्ष किशोर डांगे तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष गणेश दिनकर युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जुनेद पठाण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल साबळे तालुका सरचिटणीस गरजे साहेब ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष महेश दादांना ननवरे शहर उपाध्यक्ष आकाश काळोखे काँग्रेस तालुका सरचिटणीस सुनील दौंड तालुका सरचिटणीस रोहिदास खेडकर अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष असलम सय्यद काँग्रेस युवा नेता राहुल ढाकणे काँग्रेस स्वयंरोजगार विभागाचे दत्ता मोरे विद्यार्थी काँग्रेसचे इजाज भाई पठाण तालुका सेक्रेटरी तालुका सरचिटणीसागर तरटे आदि सह अनेक सहकारी उपस्थित होते,
सूत्र सूत्रसंचालन प्राध्यापक जालिंदर काटे यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष अनिल साबळे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे