भिंगार कॅम्प पोलीसांनी पकडला पंचवीस हजाराचा गांजा! दोन आरोपींना घेतले ताब्यात!

अहमदनगर दि. २७ जानेवारी (प्रतिनिधी) भिंगार कॅम्प पोलिसांनी पंचवीस हजार रुपयांचा गांजा पकडत दोन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती भिंगार पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की,
-दि.26/01/2023 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचेचे प्रभार सपोनी/श्री. शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, बाराबाभळी परीसरात नगर पाथर्डी रोडवर निळे रंगाचे कारमध्ये दोन इसम
हे गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने श्री.संपतराव शिंदे पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सापळा लावून थांबलो असता नमूद कार ही बातमी प्रमाणे संशयितरित्या येत असल्याने तीला हात दाखवून थांबवून रस्त्याचे बाजूला घेऊन त्यातील इसमांना
गाडीचे खाली उतरण्यास सांगून सदर इसमांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी नाव
1)वसीम मुजाहीद शेख वय 34 वर्षे रा.बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन चौक भिंगार ता.जि.अहमदनगर
2)अजय उर्फ सोनू रामचंद मुदलीयार वय 32 वर्षे रा.सिटीझन कॉलनी,विजय लाईन चौक,भिंगार ता.
जि.अहमदनगर असे असल्याचे सांगून त्यांना त्यांचे ताब्यातील कार नं.एम.एच.12जे सी 8471 हीची झडती
घेण्याचा उद्देश समजावून सांगून सदर कारची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर कारचे पाठी मागील
डिक्कीमध्ये एका पांढरे रंगाचे तळवटामधील एका प्लॅस्टीक पिशवीमध्ये हिरवट रंगाचा ओला सुका गांजा
गुंढाळलेल्या स्थितीमध्ये मिळून आला आहे.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 25,000/रूकिं.चा एका 4 किलो 955 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा उग्र वासाचा ओला सुका गांजा प्रतिकिलो
5000/- रु प्रमाणे तसेच 65,000/- रू किं चे दोन ॲन्ड्रॉईड मोबाईल व 5,00,000/- रू किं ची एक
मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कंपनीची निळे रंगाची चारचाकी कार तिचा नं.एम. एच.12 जे.सी.8471 असा नंबर असलेली कार मिळून आल्याने पोहेकॉ/अजय नारायण नगरे यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पो स्टे येथे गुरनं 57/2023 एन.डी.पी.एस.कायदा कलम 8(क),20(ब) प्रमाणे
रजि.दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.श्री.शिशिरकुमार देशमुख हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधिक
श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,पोलिस निरीक्षक
श्री.संपतराव शिंदे कोतवाली पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक
पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,पोसई/किरण साळुंके,सफौ/रमेश वराट,सफौ/कैलास
सोनार,सफौ/राजु वैरागर,पोहेकाँ/अजय नगरे,पोहेकाँ/ गोविंद गोल्हार,पोहेकाँ/
विलास गारूडकर,पोहेकाँ/ रघूनाथ कुलांगे,पोना/राहुल द्वारके,पोना/ सन्नि
धोंडे,पोना/ संतोष आडसुळ, चापोकाँ/अरूण मोरे, चापोकाँ/समीर शेख,
होमगार्ड/साबीर शेख यांनी सदरची कारवाई केली आहे.