सहज योगाने मनुष्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती होते:मा.नगराध्यक्ष सौ उषा राऊत कर्जत तालुका सहजयोग परिवाराच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न.

कर्जत – कर्जत शहरामध्ये संक्रांतीनिमित्त कर्जत तालुका सहजयोग परिवाराच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपेत करण्यात आला.या कार्यक्रमाला 200 महिलांनी सहभाग घेऊन परमपूज्य श्री माताजींच्या कृपेने आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला. व कुंडलिनी जागरणाचा अनुभव घेतला या कार्यक्रमांमध्ये डॉ चंद्रशेखर मुळे यांनी सहज योगा बद्दल माहिती देऊन सर्वांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या अनंत आशीर्वादाने करून देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी माननीय नगराध्यक्ष सौ उषा राऊत हे अध्यक्षस्थानी होते. ते मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, सहजयोग ध्यान साधना करणे काळाची गरज असून सर्वांनी या ध्यानाचा फायदा घ्यावा. ध्यान केल्यामुळे मनाशांती प्राप्त होते.
या वेळी कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई भैलुमे , नगरसेविका ताराबाई कुलथे, नगरसेविका हर्षदा काळदाते ,डॉ जयश्री मुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ यशोदा नेवसे ,सौ मीना कुलथे ,सौ सुजाता शहाणे, सौ रूपाली शहाणे ,सौ शकुंतला कानडे ,सौ कविता सूर्यवंशी ,सौ कमल कानडे, सौ कोहळे स्वाती, सौ शकुंतला पाठक , डॉ ताडे, श्री विनायक अभंग या सर्वांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब कानडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार राजेंद्र ढेरे यांनी मानले