रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संघटक पदी मेहरजी कांबळे यांची निवड!

अहमदनगर दि. ११ जानेवारी (प्रतिनिधी)
रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आणि इंदू मिलचे प्रणेते बहुजन हृदय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये व रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय किरण भाऊ घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा आणि घराघरात रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी संघटना बांधण्याचे काम अश्वगतीने चालू आहे याच अनुषंगाने रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय चंद्रकांत जाधव तसेच जिल्हा महासचिव आयु अमोलजी मकासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर शहरात बैठक होऊन आंबेडकर घराण्यावर प्रचंड अशी निष्ठा असलेले व सामाजिक प्रश्नांची जाण असणारे तरुण तडफदार असे नेतृत्व असलेले आयु मेहरजी कांबळे यांची अहमदनगर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली .यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देऊन शाल व बुके देऊन त्यांचा सन्मान केला , यावेळी आयु राहुलजी कांबळे ,दिलीपजी कांबळे पी आर पीचे किरणजी जाधव उपस्थित होते.