दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करत पत्रकार बांधवांचा यथोचित गौरव!

राहुरी ७ जानेवारी ( प्रतिनिधी) –
6 जानेवारी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधत राहुरी शहर व तालुक्यात दर्पनकारांना पुष्पहार अर्पण करत पत्रकार बांधवांचा यथोचित गौरव करुन सत्कार करण्यात आला.
देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे मुख्याधिकारी अजित निकत यांनी पत्रकारांचा सन्मान केला.
राहुरी शहरात माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांचे संपर्क कार्यालयात युवा नेते हर्षदादा तनपुरे यांनी सत्कारप्रसंगी गौरोवोद्गार काढत यथोचित सन्मान करत पत्रकार बांधवांनी धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगतानाच एखाद्या इमारतीमधे आपण गेलो तर इमारतीचे काम पाहून कौतुक करतो परंतु ती इमारत ज्या खांबावर उभी आहे त्या खांबाचे कौतुक करत नाही अगदी तसेच लोकशाहीत जे चार खांब आहेत त्यापैकी एक खांब हा पत्रकारीतेचा आहे तेही राष्ट्ररुपी इमारत उभी राहताना महत्त्वाचे आहे. आमच्या जडणघडणीत पत्रकार यांचा मोलाचा सहभाग आहे असे सांगत याथोचित सन्मान केला.यावेळी नंदकुमार,तनपुरे,संतोष आघाव,पांडू उदावंत,बाळासाहेब उंडे,प्रकाश भुजाडी आदी उपस्थित होते.
तसेच स्नेह सदन चर्च येथे फादर मायकल राजा व त्यांचे सहकारी यांनीही पत्रकार बांधवांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या. येथे रिपाइं तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे,उपाध्यक्ष सुनिल चांदणे,ॲड.प्रकाश संसारे,नवीन साळवे,रतन पाळंदे,अशोक पलघडमल,रत्नाकर दोंदै,अमृत साळवे आदी उपस्थित होते,
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी बहूसंख्येने उपस्थित होते.