गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेने केले एकलाख 80 हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस जप्त!

अहमदनगर दि.७ जानेवारी (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने केले एकलाख 80 हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची अधिक माहिती अशी की,
शुक्रवारी सकाळी खाटीक गल्लीतील सांधु कारंजा मशीदच्या पाठीमागे सुरू असलेल्या कत्तलखाण्यावर छाप टाकुन नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे एकलाख 80 हजार रुपये किमतीचे ९०० किलो गोमांस जप्त केले आहे . याप्रकरणी पोलीस अंमलदार कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये एकजणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौशीफ शरीफ शेख (वय ४० रा.सुभेदार गल्ली)असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.पोलिस निरीक्षक अनिल कटके व त्याच्या मार्गदर्शना खाली पोलीस अमलदार दत्तात्रय हेंगडे,संदीप घोड़के,संदीप पवार,विनोद मसाळकर यांचे पथक शुक्रवारी पहाटे फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना आमलदार घोड़के यांना माहिती मिळाली की खटीक गल्लीतल्या सांधु कारंजा मशिदिच्या पाठिमागे एका लोखंडी गेट च्या आत मधे गोवंशीय जनावरांची कत्तल करुण गोमांस विक्री चालु आहे पथकाने कोतवाली पोलिस स्टेशनच्या आमलदार गणेश धोत्रे योगेश,भिंगारदीवे,संदीप थोरात यांना कारवाईसाठी सोबत घेतले या पथकाने सकाळी साढ़ेआठच्या सुमारास पंचा समवेत छापा टाकून कार्यवाई केली येथे तौसीफ शरीफ शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आसुन त्याला आटक केली आहे तेथे एक लाख ८० हजार किमतीचे ९०० किलो गोमांस,२०० रुपयांचा सुरा आसा एकलाख ८० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे