महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पुर्ण – स्नेहलता कोल्हे


कोपरगाव दि.५ डिसेंबर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीचा नागपुर-मुंबई महामार्ग तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
रविवारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपूर येथून शिर्डी पर्यंत समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा केला त्याप्रसंगी तालुक्याच्या कोकामठाण तीनचारी येथील हद्दीत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वागत केले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या हिंदूहदयसम्राट सरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला करणार आहे.
कोपरगांव तालुक्याच्या ११ गावांच्या हददीतून हा महामार्ग गेला त्याबाबत आपल्याविरुद्ध विरोधकांनी सुरुवातीला गोबेल्स तंत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांमध्ये गैससमज पसविले परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूसंपादन केल्या जाणाऱ्या सुपिक जमिनीबद्दल शेतकऱ्यांना पाच पट वाढीव मोबदला मिळावा ही मागणी आपण लावून धरली, त्याबाबत अधिवेशन तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या शेतकऱ्यांच्या अडी अडचणी आणि भावना काय आहेत हे त्यांच्या कानावर घातले, वेळोवेळी उद्भवणारे अडचणी सोडवल्या.   अधिकाऱ्यांनी देखील मोलाची मदत केली. विकासाच्या धमन्या प्रगत रस्ते आहेत.
महाराष्ट्र हे समृद्ध राज्य असुन येथील शेतकरी देखील मेहनती आहेत. नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे कार्गो शेतीचे स्वप्न पुर्ण होईल. काकडी विमानतळ आणि समृद्धीसह ५ महामार्गाचे जाळे , देशातील दोन नंबरच्या लांबी ची गोदावरी नदी , संपूर्ण देशाला सर्व दिशांना समप्रमाणात मध्यवर्ती असल्याने मोगल , इंग्रजांनी या भागात वर्चस्व प्रस्थापित केले. धार्मिक , औद्योगिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे असलेल्या या लाखो पर्यटक, उद्योजक यांचा कायम वावर असतो. या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला बुलेट त्वरित सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न कायम रहातील.
समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री नाम . नितीन गडकरी , मुख्यमंत्री नाम . एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक राधैश्याम मोपलवार व विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वस्व पणाला लावून देशाच्या समृद्धीसाठी घेतलेले परिश्रम अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार सौ . स्नेहलता कोल्हे यांनी काढले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे