सामाजिक
क्रांतीसूर्य महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने कोटी कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!

अहमदनगर दि. ६ डिसेंबर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आंबेडकरांचे खरे आडनाव आंबावडेकर होते. पण त्यांच्या गुरुजींच्या आडनावावरुन ‘आंबेडकर’ हे नाव पडले.
भारतात अनेक थोर नेते, समाज सुधारक होऊन गेले. त्यापैकी महात्मा फुले, म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जीवनाला वेगळी दिशा दिली. डॉ. आंबेडकर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले, संपूर्ण आयुष्य दलितांसाठी झगडले, म्हणून त्यांना ‘दलितांचे कैवारी’ असे म्हणतात.
भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. १४ एप्रिल १८९१ मध्ये महू’ गावात अशाच एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. आईच्या नावावरूनच पाळण्यात त्यांचे नाव ‘भीम’असे ठेवण्यात आले.
बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम.ए.,पीएच.डी. ही पदवी घेतली. व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.
भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान, अवहेलना त्यांना सहन होईना. १९२० साली राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने ‘मूकनायक’ हे पाक्षिक काढले. १९२७ साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून ते ओळखू लागले. त्यांनी अन टचबेल’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती. अशा या महामानवाचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.
क्रांतीसूर्य महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने कोटी कोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!