माता रमाई जयंती निमित्त पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न…

पाथर्डी (प्रतिनिधी वजीर शेख)माता रमाई जयंती निमित्त पाथर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी पाथर्डी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात माता रमाई व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आरपीआयचे यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष श्री अमित भाऊ काळे राजाभाऊ राजगुरू जिल्हा सरचिटणीस रवींद्रजी आरोळे जिल्हा संघटक सुरेश भागवत पी आर पी चे ज्येष्ठ तालुकाध्यक्ष श्री. विलास गजभिव तसेच युवा नेते योगेश दौंड सखाराम दौंड प्रभाकर ठोंबे आदी मान्यवर उपस्थित होते पाथर्डीत ही जयंती साजरी करण्यात आली तसेच हा कार्यक्रम आटोपल्यावर पुढील कार्यक्रमासाठी जायचे असता जिल्ह्याचे युवा अध्यक्ष श्री अमित भाऊ काळे यांना फोन आला त्यानंतर ते पुढे कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही तेव्हा पुढील कार्यक्रमासाठी श्री रविंद्रजीआरोळे, तसेच सुरेश भागवत यांच्या हस्ते पुढील कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावेळी धायतडक वाडी खेरडे लोखंडवाडी व सोमठाणे अशा चार ठिकाणी शाखा ओपनिंग चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी युवा जेष्ठ व महिलांना खूप छान असे मार्गदर्शन श्री रवींद्रजी आरोळे व सुरेश भागवत यांनी केले यावेळी गावचे सरपंच श्री अमोल नरवडे ग्रामपंचायत सदस्या सौ अर्चना धोंडे व समस्त सोमठाणे ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी श्री सुरेश भागवत व श्री रविंद्रजी आठवले यांना युवानेते श्री योगेश धोंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व थोड्याच दिवसात एक पाथर्डी तालुक्यासाठी बुलंद तोफ तालुक्याचे नेतृत्व करेल असे आश्वासन दिले या कार्यक्रमासाठी योगेश धोंडे सखाराम दौंडे किरण गवडे गणेश शिंदे शिवाजी शिंदे सचिन नरवडे अजय पाखरे विलास साळवे सागर देवडे आदी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमठाणे शाखाध्यक्ष सखाराम दौंड यांनी केले तर आभार युवा नेते योगेश दोंडे यांनी केले.