आदर्श समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : संजय शिंदे छावणी परिषद शाळेतर्फे स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्नेहबंध सोशल फौंडेशनने अल्पावधीतच विविध समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केली आहे. आदर्श नागरिक घडविण्यासाठी मुलांवर बालपणापासून संस्कार व्हावेत म्हणून छावनी परिषद शाळेत अनेक मान्यवरांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करतात .
म्हणून एक आदर्श समाज निर्मितीसाठी हातभार लावणा-या सामाजिक कार्यात योगदान देणारे स्नेहबंधचे उद्वव शिंदे यांना “सावित्रीज्योती सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार”२०२२ नाशिक व “महात्मा फुले समता पुरस्कार” देऊन गौरवले गेले हे सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन छावणी परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी केले.
सत्कारप्रसंगी योग शिक्षक रामचंद्र लोखंडे, उज्ज्वला पाटकुलकर, सुभाष भारूड, स्नेहल लवांडे, लता झिने, संजय हजारे, महेश भगत, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संजय शिंदे म्हणाले, बालवयातच मुलांवर उत्तम संस्कार केले गेले तर त्यांच्यातील सुप्त गुणांना विकसित केले जाऊ शकेल आणि एक आदर्श समाज निर्मिती मध्ये हातभार लागेल. मुलांचे पालक धावपळीत मुलांना अधिक वेळ देऊ शकत नाही, त्यासाठी स्नेहबंध फौंडेशन सारख्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवले तर संस्कार देण्याचे कार्य उत्तम रीतीने करता येईल, असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, ध्येय साध्य करण्यासाठी पुढे चालत असताना एक विचाराचे माणसे आपोआप मागे येतात.