प्रशासकिय

भारताचे संविधानाने सर्वसामान्यांना अधिकार दिले- जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

शिर्डी, दि. २७ नोव्हेंबर – भारताचे संविधान हे सर्वसमावेशक असून प्रत्येकाने महिला सबलीकरणाचा अर्थ समजून घ्यावा. संविधानाने सर्वसामान्यांना आपले अधिकार दिले आहेत. असे प्रतिपादन कोपरगांव जिल्हा न्यायाधीश-१ व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी केले.
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती व डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.को-हाळे बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश-२ भुजंगराव पाटील, सहदिवाणी न्यायाधीश(वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित,दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे,सहाय्यक सरकारी वकील अशोक टुपके, डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा सुरवसे,‌ महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री सुशांत घोडके, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बंडू बडे, सागर नगरकर, वकील संघाचे ॲड.मनोज कडू, ॲड.सुरेश मोकळं, ॲड.नितीन गंगावणे, ॲड.गणेश मोकळ, ॲड.करुणा सोनवणे, ॲड.सुषमा भोसले, यांचे सह शाळेचे शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

या प्रसंगी न्यायाधिश श्री.को-हाळे पुढे म्हणाले, संविधानाने मुलांसोबत मुलींनाही समानतेचे हक्क दिले आहे. मुलगी झाली म्हणजे कुटुंबाला जबाबदारी का वाटते. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मुली व महिला दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे सारखी असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. पालक मोठ्या जबाबदारीने पाल्याचे शिक्षण करतात. शालेय शिक्षणात मुलींनी अभ्यासिकावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मोबाईलचा वापर गरजेपुरता असून सोशल मीडिया माध्यमातून अज्ञानपणात होणा-या चुका टाळायला हव्यात.

या प्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित म्हणाले, संविधानाने काय दिले यांचे अवलोकन केले तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अर्थ कळेल.सर्व सामर्थ्य वापरून महिलांनी बाहेर पडावे.आपला हक्क आणि आपल्या हिमतीवर पाय रोवून उभे रहा. संविधान तुमचे सोबत आहे.

या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव खामकर, जिल्हा सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे, सहाय्यक अभियोक्ता अशोक टुपके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शहरातून संविधान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे संविधानाचे पुजन करुन संविधान प्रस्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यालयाचे प्रांगणात संविधान दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा सुरवसे यांनी केले.सूत्रसंचालन किरण चांदगुडे तर आभार प्रविण निळकंठ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गितांजली गायकवाड, वेनूगोपाळ अकलोड, सविता साबळे, मनोहर म्हैसमाळे, संजय गावित्रे, अरुण बोरणारे, दिपक भोये यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे