संविधान दिन व स्वर्गीय अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त सीडी देशमुख लॉ कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

अहमदनगर दि.२७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
संविधान दिन व स्वर्गीय अनुराधाताई लक्ष्मणराव ढोबळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सीडी देशमुख लॉ कॉलेज येथे संविधानावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट कराळे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की संविधानाप्रमाणे आपण मार्गक्रमण केल्यास आपला देश निश्चित जगात प्रथम असेल, संविधानाने दिलेले अधिकार सांगताना जबाबदारी ही प्रत्येकाने अंगीकारावी प्रत्येक माणसावर विश्वास ठेवा यावेळी संविधाना प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर आर बेग यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रसाद पाटसकर यांनी केले यावेळी संस्थेचे लोकल सेक्रेटरी प्रा. ना. म. साठे हे उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले. प्रथम क्रमांक शितल महादेव वाघमारे या विद्यार्थिनीने मिळविला तर द्वितीय क्रमांक अमोल राठोड तर तृतीय क्रमांक आदित्य कोळी यांनी मिळविला यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक साठे सर यांचे शुभ हस्ते पारितोषिक देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका मीरा जानराव प्राध्यापक सचिन तरटे प्राध्यापिका ज बी न शेख सविता तांबे मॅडम श्री विशाल राठोड विनोद चव्हाण सतीश थोरात व निना शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बेग सर यांनी केले.