राहुल गांधींसाठीचा नगर शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश शेगावात माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडे किरण काळेंनी सुपुर्द केला नगर शहरातील कार्यकर्ते सकाळच्या सत्रात झाले भारत जोडो पदयात्रेत सहभागी

शेगाव दि.१९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : नगर शहरातून मोठ्या संख्येने राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेसाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेलेले कार्यकर्ते सकाळच्या सत्रात भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले. राहुल गांधींना देण्यासाठीचा नगर शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश संत गजानन महाराजांच्या पवित्र शेगाव नगरीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांकडे किरण काळेंनी सुपुर्द केला.
भारत जोडो पदयात्रेतील महाराष्ट्रातील राहुल गांधींची दुसरी आणि शेवटची भव्य सभा सायंकाळी शेगावात पार पडणार आहे. शहरातील कार्यकर्ते देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते शेगावात दाखल झाले आहे. शेगाव नगरीत काँग्रेसमय वातावरण झाले आहे. जोडो – जोडो, भारत जोडोच्या नाऱ्याने शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे. नगर शहरातील कार्यकर्त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली यात सहभागी होत मागील बारा दिवसांपासून शहराच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक स्थळांच्या आवारातील पवित्र माती संकलित करून तयार केलेला कलश आ.थोरातंकडे काळे यांच्या हस्ते सुपुर्द केला आहे.
शेगावतून बोलताना काळे म्हणाले की, या निमित्ताने नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला आणि शहरातील सर्व ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक केंद्र भारत जोडो यात्रेशी जोडले गेले आहेत. नगर शहरातील ऐतिहासिक मातीची ऊर्जा राहुल गांधींना या यात्रेसाठी बळ देईल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देशाचे नेतृत्व करत देश उभा करण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून केले आहे. काँग्रेसला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. राहुलजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नवा भारत पुढील काळात उभा राहील, असा विश्वास यानिमित्ताने काळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी काळे यांच्यासह ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, माजी नगरसेवक फैय्याज शेख, सावेडी उपनगर काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, युवक उपाध्यक्ष गौरव घोरपडे, क्रीडा खजिनदार नारायण कराळे, सचिव शंकर आव्हाड, युवक सरचिटणीस आकाश अल्हाट, राष्ट्र सेवादलाचे अरुण आहेर, ग्रंथालय काँग्रेस विभागाचे सुनीलआप्पा लांडगे, प्रशांत जाधव, मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, बाळकृष्ण आव्हाड, तुषार जाधव, बिभीषण चव्हाण, अनिल ससाणे, आनंद जवंजाळ, समीरखान पठाण, इरफान शेख, फैजान शेख, इंजि. सुजित क्षेत्रे, स्वप्निल सातव, संतोष जाधव, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, विजय करपे, राजू डाके, राजू साळवे आदींसह शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.