कोपरगांव येथील टाकळी नाका या ठिकाणी छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेने केली ५ लाख ९३ हजार रुपयांची सुगंधी तंबाखु जप्त!

अहमदनगर दि.१६ नोव्हेंबर (प्रतिनिधी)कोपरगांव येथील टाकळी नाका या ठिकाणी छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेने केली ५ लाख ९३ हजार रुपयांची सुगंधी तंबाखु जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांनी पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/ मनोहर शेजवळ, पोहेकॉ / संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना / शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, पोकों/सागर ससाणे, रोहित वेमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ / उमाकांत गावडे व भरत बुधवंत अशांना बोलावुन घेवुन राहाता, शिर्डी व कोपरगांव परिसरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक पेट्रोलिंग करुन माहिती घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही इसम कोपरगांव येवला रोडवरील, टाकळी नाक्या जवळ गुटखा, पानमसाला, सुगंधी तंम्बाकु मारुती कंपनीच्या वॅगनर व ओमनी गाडीमध्ये घेवुन येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अंमलदारांनी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोसई / रोहिदास ठोंबरे, पोका/खारतोडे व फड यांचेशी संपर्क करुन प्राप्त माहिती कळविली. लागलीच पोसई / ठोंबरे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी व दोन पंचाना बोलावुन घेवुन कारवाई करणे बाबत सोबत येण्यास कळविले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगांव येवला रोडवरील टाकळी नाका येथे जावुन खात्री केली असता मारुती कंपनीची एक राखाडी रंगाची वॅगनर कार व एक ओमनी कार या वाहनांवर छापा घालुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस व तयार करण्यास बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखु वाहनात असलेला दिसल्याने पथकाने वाहनातील इसमांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळखी सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी १) वसिम चाँदभाई चौपदार वय ३४, रा. गांधीनगर, कोपरगांव, २) राजमल मिश्रीलाल बोथरा वय ५०, रा. निवारा, हॉ-सोसायटी, कोपरगांव व ३) अर्जुन लक्ष्मण शेळके वय ४५, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यातील वाहन व गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखु या बाबत विचारपुस करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर माल आमचा असुन आम्ही तोविक्री करण्यासाठी आणला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना २,८२,६७८/- रु. किंमतीचा विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तम्बाखु तसेच मारुती कंपनीची राखडी रंगाची १,५०,००० /- रु. किंमतीची बॅगनर व पांढ-या रंगाची १,६०,०००/- रु. किंमतीची ओमनी असा एकुण ५,९२,६७८ /- रु. किंमतीचा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील कारवाई कोपरगांव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.