ब्रेकिंग

सावेडी उपनगरातील “यारस्त्यावर”उघड्यावरच “इमानदारीत जप”ला जातोय मटका! तोफखाना पोलिस का दाखवत नाहीत खाकीचा “झटका”!

अहमदनगर दि.१६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे उदा.मटका, बिंगो,हातभट्टी,सोरट, आदी धंदे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू असूनसुध्दा तोफखाना पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आहे.
तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या
सोना नगर चौकाच्या जवळ कुष्ठधाम रस्त्याला चिकटूनच बारस्कर मळा याठिकाणी विशेष म्हणजे अगदी उघड्यावरतीच मटका आणि रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा व्यवसाय अगदी शेजारी,शेजारी दिवसा ढवळ्या सुरू असल्यामुळे “यारस्त्यावर”उघड्यावरच “इमानदारीत जप” ला जातोय मटका! तोफखाना पोलिस का दाखवत नाहीत खाकीचा “झटका”! अशा चर्चा कुष्ठधाम रस्त्यावरील सोनानगर चौकात नागरिकांमधून व्यक्त होत असतात.
सर्व सामान्य नागरिकांना कायद्याचा धाक आहे का? अवैध धंदे,व्यवसाय करणाऱ्यांना ना पोलिसांची भीती , ना कायद्याचा धाक,मग या धंद्याना अभय देणारे नेमके कोण? हा प्रश्नही नागरिकांच्या चर्चेत येणे साहजिकच आहे.एकंदरीत बोलायचे झाले तर यावर पोलिस कारवाई का करत नाही,अन जरी झालीच कारवाई तर एखादी जुजबी कारवाई करायची,या कारवाईमुळे दोन दिवस हे धंदे बंद राहतात.पण ते कायम स्वरुपी बंद का होत नाही.हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे.आम्ही आतापर्यंत एकविरा चौक, भिस्तबाग चौक,यशोदानगर ग्राउंड बाजार,उपनगरातील या भागात चालणारे अवैद धंदे आपणा समोर आणले आहेत.या पुढेही उपगरातील व शहरातील अवैध धंदे कोणत्या ठिकाणी सुरू आहेत हे निर्भिडपणे जनतेसमोर मांडनारच आहोत.
(भाग; ५)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे