माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची सखोल चौकशी करा: .जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा जितेंद्र आव्हाड युवा मंचचे संस्थापक जितेंद्र आव्हाड यांच्या वर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची सखोल चौकशी करा या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तसेच ना.जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देणायात आले.
निवेदनात ना.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने जे काही खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम झाले त्याचा निषेध आणि ना. जितेंद्र आव्हाड यांच्या वर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची चौकशी करून कोणाच्या दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला. याची चौकशी करून कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणी सविस्तर चौकशी न झाल्यास राज्यभर आंदोलन सुरू करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे.असे
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे , महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, महिला जिल्हा उपाध्यक्षा राधाताई पाटोळे, जिल्हा सरचिटणीस आरतीताई शेलार
जिल्हा कार्याध्यक्ष रशीदभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,
जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे,
तालुका कार्याध्यक्ष, शेखरभाऊ पंचमुख,तालुका सरचिटणीस, संग्राम गायकवाड, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ चव्हाण,जिल्हा कार्यकारणी सदस्य अल्पसंख्यांक विभागाचे तोफिकभाई पटेल, बंटी भोसले,विजय चव्हाण,सावता चव्हाण ,महेश चव्हाण आदी उपस्थित होते.