वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागरभाऊ मुर्तडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामजिक कार्यक्रमाचे आयोजन! अभिष्टचिंतन सोहळ्यास आमदार संग्राम जगताप राहणार उपस्थित!

अहमदनगर (प्रतिनिधी १५ नोव्हेंबर)वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागरभाऊ मुर्तडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामजिक कार्यक्रमाचे आयोजन
अभिष्टचिंतन सोहळ्यास आमदार संग्राम जगताप राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती वर्चस्व ग्रुप कडून सांगण्यात आली आहे.
नगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमठवणारे युवा नेतृत्व,तरुणांच्या गळ्यातील ताईत सामाजिक कार्यकर्ते तथा वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागरभाऊ मुर्तडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मित्र परिवाराच्या व वर्चस्व ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर,शहरातील विविध अनाथालय संस्थांमध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन तसेच सायंकाळी ७.३० वाजता भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम संत कोंड्यामामा चौक मंगलगेट या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमानिमित्त शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,आ.मोनिकाताई राजळे,तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी,उद्योजिका रेणुकाताई वराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे,सदरील कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचेही आयोजन केलेले आहे तरी सर्व मान्यवरांनी,मित्र परिवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान वर्चस्व ग्रुप नगर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.