राजकिय

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या संदेशाने समाजाला दिशा देण्याचे काम केले – किरण काळे भारत जोडो यात्रेनिमित्त धार्मिक स्थळे, महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरातील काँग्रेसने माती केली संकलित

 

अहमदनगर  दि.१४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : नगर शहराची भूमी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. नगरच्या माळीवाड्याच्या महालक्ष्मी मंदिरात त्यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या दिलेल्या संदेशाने समाजाला दिशा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त देण्यात येणाऱ्या कलशासाठी माती संकलन अभियाना निमित्त मंदिराला भेट दिली असता काळे बोलत होते.

मंदिराचे सेवेकरी असणाऱ्या साठे कुटुंबाच्या ज्योतीताई साठे, उमेश साठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. काळे म्हणाले की, या मंदिर परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी महामानव डॉ. आंबेडकरां बरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद यांनी देखील भेट दिली आहे. मातंग समाज पंच कमिटीचे काम या ठिकाणाहून चालते. भाविकांची या मंदिराशी मोठी भावनीक जवळीक आहे. साठे परिवार गेल्या अनेक दशकांपासून येथे सेवेचे पवित्र काम करीत आहे.

काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसर, माळीवाडा बस स्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वस्तू संग्रहालय परिसरातील राजमाता जिजाऊ पुतळा, माळीवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, वाडीया पार्क आवारातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा आदी ठिकाणची पवित्र माती भारत जोडो यात्रा कलशासाठी संकलित केली.

काळे पुढे म्हणाले की, श्री विशाल गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे. हिंदू धर्मीयां बरोबरच अन्य धर्मीयांमध्ये देखील शहराच्या ग्रामदैवता विषयी श्रद्धेची भावना आहे. महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावित्रीमाई फुलेंनी नगरच्या मराठी मिशन मंडळ संस्थेत अध्ययनाचे धडे फातिमा शेख यांना बरोबर घेत गिरविले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ ही आजही हिंदुस्थानातील तमाम देश बांधवांच्यासाठी स्फूर्तीची केंद्र आहेत.

यावेळी नफरत छोडो, भारत जोडो.. जोडो – जोडो, भारत जोडो.. वंदे मातरम.. भारत माता की जय… असा जयघोष करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाची एकात्मता अखंडित राहावी यासाठी धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना करण्यात आली.

यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, पै.दीपक जपकर, गौरव घोरपडे, भरत पुंडे, उषाताई भगत, राणीताई पंडित, जरीना पठाण, पुनम वनंम, अर्चना पाटोळे, मीना रणसूर, शैलाताई लांडे, मोमीन सय्यद, सोफियान शेख, हनीफ मोहम्मद जहागीरदार, शंकर आव्हाड, मच्छिंद्र साळुंखे, ज्ञानेश्वर शिरसाट, बापू डोंगरे, सचिन साठे, सौरभ भोसले, ऋतिक जाधव, विकास घोरपडे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे