सामाजिक
“या” माजी पंचायत समिती सदस्य व विद्यमान ग्राम.सदस्य दांपत्याने केल्या दिपावली निमित सफाई कामगारांना साड्या वाटप!

मिरजगाव (प्रतिनिधी) दिपावली व पाडव्याचा सण नुकताच होऊन गेला.या सणानिमित्त मिरजगाव येथील माजी.पं.स.सदस्य पंढरीनाथ विठ्ठल गोरे. व विद्यमान ग्रांपचायत सदस्य शुभांगी पंढरीनाथ गोरे. यांच्या कडुन मिरजगाव ग्रांपंचायतीच्या महीला सफाई कामगारांना दिपावली व पाडव्या निमीत्त साड्या वाटप करण्यात आले.
गोरे कुटुंब नेहमीच सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असून सामाजीक बांधीलकी व गोरगरीबांची सेवा हाच खरा धर्म माननारे हे गोरे कुटुंब आहे.
या कार्यक्रमा वेळी मिरजगावचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद कवडे ,रमेश घोडके, शीवाजी नवले, डॉ. विलास कवळे, वीर नाना, शेख रफिक, म्हेत्रे दादा, अनिल म्हेत्रे, आधी मान्यवर उपस्थित होते.