स्थानिक गुन्हे शाखेने उद्धवस्त केले 1,45,000/ रुपयांचे अवैध गावठी हातभट्टीची साधने श्रीरामपूर शहरात केली कारवाई!

अहमदनगर (प्रतिनिधी २ नोव्हेंबर):-श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 04 आरोपीविरुध्द कारवाई करुन 1,45,000/- रुपये (एकलाख पंचेचाळीस हजार रु.) किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/बबन मखरे, विजयकुमार वेठेकर,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले,ज्ञानेश्वर शिंदे,आकाश काळे,शिवाजी ढाकणे,मपोकॉ/ज्योती शिंदे,चापोहेकॉ/आंबादास पालवे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.01/11/2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 04 ठिकाणी छापे टाकुन एकुण 1,45,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 2,300 लि. कच्चे रसायन, 300 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 04 आरोपीं विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-04 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अ.नं.पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1.श्रीरामपूर शहर 989/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
10,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
2.श्रीरामपूर शहर 990/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु
3.श्रीरामपूर शहर 991/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 40,000/- रु.किचे 800 लि. कच्चे रसायन
10,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
4.श्रीरामपूर शहर 992/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु
एकुण
04 महिला आरोपी 1,45,000/- रु. कि.ची 2300 कच्चे रसायन 300 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु
सदरची कारवाई मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,मा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.