दीपावली विशेष अंकातून ज्ञानसंवर्धन – न्या. दिवाकर

अहमदनगर – दिपावली विशेषांकातून ज्ञान संवर्धन होत असल्याने रसिक वाचकांसाठी ही दिवाळीची मेजवानी आहे, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त न्या. भानुदास दिवाकर यांनी केले .
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित दीपावली विशेष अंक प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
न्या. दिवाकर पुढे म्हणाले की ,या प्रदर्शनात विविध विषयांवर दीपावली अंक असून सर्व वयोगटाच्या रसिक वाचकांनी लाभ घेतला पाहिजे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर होते. यावेळी यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे दिवाळी सणाची वाट लोक आनंदाने पाहतात, छोटी मुले फटाके वाजवण्याची वाट पाहतात त्याचप्रमाणे वाचक रसिक देखील दिवाळी सणानिमित्त दिवाळी विशेषांक वाचण्यासाठी दिवाळी विशेष अंकाची आतुरतेने वाट पाहतात .जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात यावर्षी असंख्य दिवाळी अंक उपलब्ध असून हे प्रदर्शन १५ नोव्हेबंर पर्यंत सकाळी १०.३० ते ५.३० यावेळेत सर्वासाठी विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध आहे.तरी जास्तीत जास्त रसिकांनी या दिवाळी अंक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निरीक्षक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन तर आभारप्रदर्शन हनुमान ढाकणे यांनी केले. याप्रसंगी संतोष कापसे , ऑडिटर संतोष वाडेकर, लक्ष्मण सोनाळे ,ग्रंथपाल अमोल इथापे ,सुभाष मरकड,शैलेश घेगडमल ,आदिसह वाचक उपस्थित होते.