भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला! कात्री लागलीय नागरिकांच्या खिशाला!

अहमदनगर (मुख्य संपादक महेश भोसले)
सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या वाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस वाढतच आहेत.खिशाला न परवडणाऱ्या महागाईमुळे नागरिकांचा जीव अगदीच मेटाकुटीला आलेला आला आहे.गॅस सिलेंडर पासून सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे म्हणजेच भाजीपाल्याचे भाव तर गगनाला भिडले असल्याने संसाराचा गाडा ओढताना सर्व सामान्य नागरिकांच्या नाकात दम आल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.नगरमधील भाजीपाल्याच्या वाढत्या भावामुळे नागरिक पिचून गेले आहेत.जीवन जगण्यासाठी अन्न असणे गरजेचेच असल्या कारणाने जिथे एक किलो घ्यायचे तिथे अर्धा किलो,पावशेर घेऊन कुटुंब चालविले जात आहे.दिवाळीच्या सणानंतर भाजीपाल्याचे भाव कमी होतील.अशी आशा नागरिकांना होती. पण भाव कमी होताना दिसत नाही.भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला!
कात्री लागलीय नागरिकांच्या खिशाला! असेच म्हणावे लागेल.
*किरकोळ विक्री भाजीपाला भाव
1 किलो चे बाजार भाव आहे .
बटाटे – 25 ते 30 रुपये किलो
टमाटे 30 ते 40 रुपये किलो
कांदे 30 रू.किलो
काकडी 30 ते 40 रू.किलो
गवार 100 ते 120 रू.किलो
घेवडा 70 ते 80रू.किलो.
कोबी 30 ते 40 रू.किलो.
फ्लॉवर 60 ते 70 रू.किलो.
आद्रक 70 रू. किलो
भेंडी 40 रू.किलो
शिमला 60रू.किलो
वांगे 70 ते 80 रू.किलो
दोडके 60 रू.किलो
घोसाळे 50 ते 60 रू.किलो
कार्ले 50 ते 60 रू.किलो
लिंबु 40 ते 50 रू.किलो
भोपळे 40 ते 50 रू.किलो
पालक 30 एक जुडी
मेंथी 30 एक जुडी
कोंथबीर 30एक जुडी
मिर्ची 60 ते 70 रू.किलो
लसूण 100 ते 120रू.किलो
एकंदरीतच आताचे भाजीपाल्याचे गगनाला भिडलेले भाव काही
प्रतिक्रिया:
***
भाजीपाला महाग असल्याने परिवार चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एक किलो घेण्याऐवजी पावशेर अर्धा किलो घेऊन गुजराण करावी लागते आहे.
( गृहिणी नगर शहर)
पाऊस जास्त झाल्यामुळे भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी असल्याने भाव जास्त वाढले आहेत.पाऊस इथूनपुढे पडला नाही तर आवक वाढेल व भाजीपाल्याचे दर कमी होतील.
नितीन नगरे
बाजार समिती
अहमदनगर
भाजीपाला
व्यापारी