भिंगार पोलिसांनी केली 1,66,900/ रुपयांची अवैध गावठी हातभट्टीची दारू उद्धवस्त!

अहमदनगर (प्रतिनिधी) भिंगार पोलिसांनी मोठी कारवाई करत भिंगार शहरातील 1,66,900/ रुपयांची अवैध गावठी हातभट्टीची दारू उद्धवस्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध गावठी दारू धंदे करणाऱ्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की
-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करणा-या तसेच तयार करणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई करून 1,66,900/- रू किंची गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच दारू तयार करण्याचे रसायन व साधणांसह दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशाने आज दि. 31/10/2022 भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत ब्रम्हतळे,घास गल्ली,भिंगार येथे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने मिळून दोन पंचासमक्ष छापे टाकून ब्रम्हतळे येथील 1.संतोष गोवर्धन पवार 2.पप्पू उर्फ गोकुळ अनिल पवार यांचे राहते घराचे बाहेर असलेल्या गा.ह.भ.ची दारू तयार करणा-या भट्ट्या उध्वस्त केल्या तसेच घास गल्ली,भिंगार येथील भाऊ भिंगारदिवे याचे राहते घरात तसेच पत्र्याचे शेडमधून सुमारे 29,700/- रू किंची गाहभची तयार दारू जप्त करून पचासमक्ष नष्ठ केली.भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे सो,सपोनी/शिशिरकुमार देशमुख,म.पो.उप.नि/ शितल मुगडे,सफौ/कैलास सोनार,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोहेकाँ/46आर. के.दहीफळे, पोहेकाँ/1859 जालिंदर आव्हाड,पोहेकाँ/1175 दिलीप झरेकर,पोना/1072 राहुल गोरे,पोना/2178 राहुल द्वारके,पोना/1407 भानूदास खेडकर,पोना/2284 संदिप साठे, पोकाँ/1004एम एस निमसे,होम/वाघ,/कदम यांनी कारवाई केली आहे.