ब्रेकिंग
गुजरातमधील झुलता पूल दुर्घटनेतआतापर्यंत 137 जणांचा मृत्यू!

देशस्तंभ न्यूज नेटवर्क
गुजरातमधील झुलता पूल दुर्घटनेतआतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरातमधील (Gujarat) मोरबी येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. मोरबीमधील प्रसिद्ध झुलता पूल (Morbi Bridge Collapse ) रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. या पुलावर उभे असलेले सर्व पर्यटक मच्छु नदीमध्ये पडले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी झुलता पूल दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. ही घटना घडल्यापासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.