महसुलमंत्री विखेंसोबत फोटोसाठी पुढेपुढे करणारे त्यांच्यावर टिका झाल्यावर कोणत्या खुराड्यात गेले? केंद्र राज्यातील बेरोजगारांवर बोलण्यापेक्षा एमआयडीसीतील ठेकेदार बगलबच्यांकडून बहीरूपी लंकेने पैसे कमवण्याचे धंदे बंद करावेत-अविनाश पवार

पारनेर(प्रतिनिधी दत्ता ठूबे)
स्वतःला देव समजत असणा-यांकडून जनता तरी काय अपेक्षा करणार ? रंगबदलुंना जनतेची,आणि बेरोजगार बंधु भगिनी ची भावना कशी कळणार? अाता बोलणारे
पारनेर तालुक्यातील जनता कोरोना संकटात सापडलेली असताना तालुक्यातील कुणाची आई,कुणाचे वडील तर कुणाचा भाऊ,बहिण,बायको मृत्यूमुखी पडत असताना पुर्णपणे सरकारी सुविधा असणा-या शासकीय कोरोना सेंटर मध्ये गलिच्छ राजकारण करत नाचून स्वतःच्या प्रसिद्धी साठी पिक्चर काढुन तालुक्यातील आम दुःखी जनतेच्या भावनेशी खेळुन,हळव्या, खचलेल्या माय माऊली जनतेला वेड्यात काढुन त्यांच्या भावनेचा अवमान करत, नौटंकी करत उड्या मारणं अाता टिका करणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला शोभलं का..?
पारनेर तालुक्यात पावसाने हाहाकार घालून नागरिकांची शेती,पिके रस्ते,पुलं वाहुन गेले आहेत. पारनेर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे,उध्वस्त झाला आहे त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन यावर त्वरित मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत राजकारण विरहित एकञीत येत शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी सरसकट मदतीसाठी प्रयत्न करणं लोकप्रतिनिधी म्हणुन गरजेचं असताना यांनी हार तुरे घेतले,यांनी आलीशान गाडी घेतली असे बिनबुडाचे आरोप करुन काय साध्य होणार असल्याचा खोचक सवाल मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लंकेना विचारला तसेच राज्य केंद्राच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढणार बोलण्यापेक्षा पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मध्ये पारनेर तालुक्यातील किती सुशिक्षित भुमीपुञांनी नोकरी दिली हे पन जरा पञकार परिषद घेऊन सांगा. पारनेर तालुक्यातील सुशिक्षित होतकरू मुलांची अक्षरशः चाळीस,चाळीस वर्षे वये होऊन लग्न होत नाहीत याला सर्वस्वी जिम्मेदार हाच टिका करणारा बहुरुपी आमदार आहे.सुपा ठेकेदारीच्या माध्यमातून हाच बगलबच्चे तयार करुन बेरोजगारी निर्माण करत आहे.गटातील आमदारांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या असताना लोकप्रतिनिधी आमदार मोहदय यांनी स्वतः मतदार संघातील जिल्हा परिषद शाळाचे दोन दोन वेळा भुमीपुजन करुन सुद्धा शाळा मंदीरामध्ये भरतात हे दुर्दैव आहे.मतदार संघात शाळा मंदीरामध्ये भरवून विद्यार्थ्यांच्या भावनेशी गलिच्छ राज कारण करुन कोण खेळत आहे? हे पण एकदा सांगा की साहेब तुमची नौटंकी आगामी काळात जनता मुळीच विसरणार नाही, त्यामुळे आगामी काळात जनतेच्या भावनेशी खेळुन राजकारणात पोळी भाजून घेण्याचा आम्ही फकीर बोलुन चाललेला केविलवाणा प्रयत्न करणा-यांना जनता आगामी काळात माफ करणार नाही . त्यामुळे शाळा मंदीरामध्ये का भरतात याचं उत्तर पण लोकप्रतिनिधीनी द्यायला हवे विकास कामं फक्त पेपरात छापून चमकोगीरी करण्यासाठी चालु असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे तसेच पारनेर तहसीलदार यांनी शेतकरी ओल्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेला असताना महसूल प्रशासनाने काटेकोरपणे कामं केलं नाही तर या सर्व घटनेवर लक्ष ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तहसीलदार यांना सोडणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.