सैनिकांच्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
अहमदनगर, दि. 19 ऑक्टोबर (प्रतिनिधी) – माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचे मार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीईएमएस, बीयूएमएस, बीएस्सी, बॉयोटेक, बीएड, एलएलबी,बीएमसी,एचएम, बीपीएड, बीएफएस्सी,बीएफए, बीएस्सी अॅग्री, बीएएसएलपी, बीएफटी, बीबीए, बीसीए, बीप्लन, बीटेक, बीई, बीऑर्क., जीएनएम, बीएनवायएस, डीफार्मसी, बीएस्सी ऑप्टोमेट्री, बीएफडी, बीएस्सी मायक्रोबायोलॉजी, बीएस्सी, एचएचए तसेच ज्या पाल्यांनी पदवी परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत व त्यांनी एमबीए आणि एमसीए या अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज www.ksb.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या शिष्यवृत्तीचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे ऑनलाईन प्रक्रियेने ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. अर्ज मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रत्यक्ष भेट देवून पडताळून घ्यावा. या शिष्यवृत्तीचा जास्तीत जास्त माजी सैनिक / माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.