अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर प्राथ शिक्षक बॅकेतील विद्यमान सत्ताधार्यांनी सभासदांना घड्याळ भेट देण्याचा निर्णय घेतला . या भेट खरेदी करताना च मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचा गौप्यस्फोट सदिच्छा मंडळाने केला होता व यासंदर्भातील लेखी तक्रार मा. उपनिबंधक साहेब अ .नगर याचे कडे केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्य चौकशीचे आदेश दिलेले होते तदनंतर सत्ताधारी मंडळातील रोहोकले गटाने यासंदर्भातील याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती. त्याची सुनावणी लवकरच होणार आहे परंतु तत्पूर्वीच या खरेदी प्रकियेवरच बॅकेच्या लेखापरीक्षकांनीच ताशेरे ओढल्यामुळे ही घड्याळ खरेदी वादाच्या भोवर्यात अडकली असल्याची माहिती सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचे प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली .
त्याच हितसंबधातून स्थानिक किवा महाराष्ट्रातील अजंता कंपनीच्या डिलर ऐवजी तीन निविदा गुजरात राज्यातून भरल्या जातात काय? आणि एका नगर च्या सांय दैनिकात ( डिजीटल ) नसलेल्या वर्तमानपत्रात जाहिर प्रसिद्ध केली जाते काय? एकनिविदा नगर मधून भरलेली असताना बाहेर राज्यातील निविदा सदरहू कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित नसताना कोणत्या पधतीने मंजूर केली गेली याचे गौडबंगाल काय ? याचे समाधानकारक उत्तर बॅकेच्या संचालक मंडळाला देता आलेले नाही . घड्याळ खरेदी प्रकरणाची निविदा राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील वर्तमान पत्रात का प्रसिद्ध केली नाही तरीही हया निविदेची कात्रणे गुजरात राज्यात अजंता कंपनी पर्यंत पोहचवणारे महान संचालक कोण ? व त्यांच्या समवेत पोरबंदर ची वारी करणारे नेते कोण होते याची खमंग चर्चा निवडणुकीच्या रणधुमाळीत सभासंदामध्ये रंगताना दिसतआहे दि.१७ डिसेंबर २०१९ च्या संचालक बैठकीतील ठराव क्रं – २१ अन्वये ही घड्याळ खरेदी निविदा मंजूर करण्यात आली सदरहू कंपनीचा प्रतिनिधी दरनिर्धारणासाठी हजर नसताना केवळ कंपनी ने पाठवलेल्या ई -मेलवर घड्याळ किंमत ठरवणेत आली रु ७२ लाख रक्कम सदर कंपनी ला आगाऊ देण्यात आली घड्याळे ताब्यात मिळण्या पूर्वीच सहा महिने अगोदर रक्कम देण्यासाठी संचालक मंडळ का मेहरबान झाले असेल ? असा प्रश्न लेखा परिक्षणा त उपस्थित करणेत आला आहे.
कंपनीला आगावू रक्कम एकाच वेळी देणे चुकीचे आहे असे अहवालात म्हटले आहे पैसे आगावू देवूनही घड्याळे तीन महिने उशिराने दिली गेली तरीसुद्धा बॅकेनी कंपनीवर कोणतीही कार्रवाई केली नाही किंवा तसा पत्रव्यवहार केला नाही केवळ माया जमा करण्याचे उद्देशाने ही घड्याळ खरेदी गुजरात राज्यातून केली आहे घड्याळ गोडावून ( पाथर्डी ) च्या भाड्यावरून संचालकांची पुरती नाचक्की झालेली आहे
या बेताल प्रवृत्तीच्या सत्ताधारी गुरुमाउली मंडळाला सभासद घरचा रस्ता दाखवतील असे मत राजेद्र शिंदे यांनी व्यक्त केले.