छावणी परिषदेला मिळालेले यश हे सामूहिक प्रयत्नांचे फलित स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचे प्रतिपादन!

अहमदनगर (प्रतिनिधी) – छावणी परिषदेचे स्वच्छता कर्मचारी रोज दैनंदिन सफाई करून शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी नेहमीच चांगल्या प्रकारे काम करतात. नागरिकांचा सहभाग व सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर छावणी परिषदेस स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. छावणी परिषदेला मिळालेले हे यश हे अभूतपूर्व सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात फास्टेस्ट मुव्हिंग कॅन्टोन्मेंट या श्रेणीत तिसरा क्रमांक मिळाला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री किशोर कौशिक यांचे हस्ते गौरव गौरव करण्यात आला. यानिमित्त स्नेहबंधतर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. याप्रसंगी शोभा भंडारी, भंडारी सप्ल्यायर्सचे संचालक रुपेश भंडारी, कार्यालय अधीक्षक स्नेहा पारनाईक, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, कनिष्ठ लिपिक अमोल कुलट, साई ट्रॉफीचे संचालक सचिन पेंडुरकर, तुषार घाडगे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत त्यामुळे यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे. कोविड महामारीच्या काळातही छावणी परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने सेवा दिली.