गुन्हेगारी

किर्ती कसबे (भेटे) यांना गंभीर मारहाण करणारा महेश भेटे व त्याला मदत करणारे त्याचा भाऊ,आई वडिलांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा! समस्त आंबेडकरी समाजाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी,आरोपींना त्वरित अटक करावी अन्यथा मृतांचा अंत्यविधी करणार नाही आंबेडकरी समाजाचा इशारा!

अहमदनगर( प्रतिनिधी):- दि.३/१०/२०२२ रोजी किर्ती विश्वनाथ कसबे(भेटे) व तिचे वडील विश्वनाथ कसबे यांना मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मोहन माणिक भेटे,मंगल माणिक भेटे यांना सदर गुन्हामध्ये सहआरोपी करुन अॅट्रोसिटी कायदयानुसार कारवाई व्हावी.या साठी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवानी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि.३/१०/२०२२ रोजी कसबे कुटूंबावर प्राणघातक हल्ला झाला.व त्यामध्ये बाप-लेकीचे उपचारादरम्यान दोघांचेही निधन झाले.या प्रकरणात आरोपी १)महेश माणिक भेटे यास अटक करण्यात आली.परंतु त्याला सहकार्य करणारे व मुलीस वारंवार जातीवरुन त्रास देणारे आरोपीचा भाऊ मोहन माणिक भेटे याने वेळोवेळी आरोपीला समजावण्या ऐवजी पाठबळ देऊन निघृण कृत्य करण्यास भाग पाडले.तसेच आरोपीची आई मंगल माणिक भेटे हीने वेळोवेळी मुलीस व कसबे कुटूंबास माणसिक,शारिरिक छळ करुन आरोपीच्या पाठीशी उभी राहिली.सदर प्रकरणांत आरोपी व त्याचा भाऊ,मोहन माणिक भेटे,मंगल माणिक भेटे,माणिक भेटे,यांचे घटना घडण्यापूर्वी व घटना घडल्यानंतरचे मोबाईल वरील सर्व कॉल रेकॉर्ड त्वरित तपासण्यात यावे,व खुनाच्या गुन्हयांत आप्रत्यक्ष मदत करून,आरोपीस पाठीशी घातले त्यामुळे मोहन माणिक भेटे,मंगल माणिक थिटे,व आरोपीचे वडील माणिक मिटे यांच्यावर खुन्हाचा गुन्हा व atrocity अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी.अन्यथा:दोन्हीही प्रेतांचा अंत्यविधी एसपी कार्यालयासमोर करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे दिनांक.७/१०/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे म्हणण्यात आले आहे.यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते मा.नगरसेवक अजय साळवे,महेश भोसले (पत्रकार),तुकाराम गायकवाड,रोहित (बंडू) आव्हाड,दिपक,सुनिल क्षेत्रे,सुनिल शिंदे, प्रतिक बारसे,विनोद भिंगारदिवे,मुन्ना भिंगारदिवे
मोहीते,समीर शेख,सुमेध गायकवाड,विशाल गायकवाड,अमित काळे,किरण दाभाडे,जहीर शेख,ललित गोरडे,,सुशील गायकवाड,अल्ताफ कुरेशी,सोमा शिंदे,योगेश थोरात,निलेश साळवे,संतोष जाधव,मनोज प्रभुणे,चंद्रकांत भिंगारदिवे,निलेश बनसोडे,जय गजरमल,बबलू चक्रनारायण,मंगेश तिजोरे,रोहन गोरखा, इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे