शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी बैठका बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन
अहमदनगर,दि.६ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत २०२२-२३ साठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी ७ ते ११ ऑक्टोंबर २०२२ कालावधीत नियोजन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांना क्रीडा शिक्षक, खेळाडू, क्रीडा संघटना तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजन विषयक माहिती क्रीडा शिक्षक, खेळाडू, क्रीडा संघटना तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना व्हावी यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ता. ७ ऑक्टोंबर रोजी शेवगाव, पाथर्डी तालुक्याची बैठक आबासाहेब काकडे महाविद्यालय (शेवगाव) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. ता.८ ऑक्टोंबर रोजी जामखेड,कर्जत,श्रीगोंदा तालुक्याची बैठक पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबिकानगर (कर्जत) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. ता.११ ऑक्टोंबर रोजी राहूरी, नगर, पारनेर तालुक्याची बैठक न्यू आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज (अहमदनगर) येथे सकाळी १० वाजता होणार आहे. अहमदनगर महानगरपालिकेची बैठक दुपारी ३ वाजता व एकविध खेळ संघटना व क्रीडा संघटना पदाधिकारी यांची बैठक सायंकाळी ५ वाजता पेमराज सारडा महाविद्यालय (अहमदनगर) येथे ता.११ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. अशी माहिती श्रीमती बिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.