ब्रेकिंग
शहरातील कायनेटिक चौकातीलअपघातात महिला डॉक्टर जागीच ठार!

अहमदनगर (प्रतिनिधी):-शहरातील कायनेटिक चौकातीलअपघातात महिला डॉक्टर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवार दिनांक ६ रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली.शिबोन अशोक टेंभेकर (वय ५६,रा.अरणगाव,ता.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.मयत महिला टेंभेकर या डॉक्टर होत्या.बांधकामासाठी लागणार्या खडीची वाहतूक करणार्या डंपरने मयत महिलेला चिरडले.अपघातात महिलेच्या मोपेड गाडीचा चक्काचुर झाला.डंपरच्या पुढील चाकाखाली टेंभेकर यांची गाडी गेली. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी शिबोन टेंभेकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अपघातानंतर डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला.